
पुणे : महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करण्यापूर्वीच प्रशासनाने तयार केलेले सांस्कृतिक धोरण स्थायी समितीमध्ये मान्यतेसाठी ठेवण्यात आल्याने व हे धोरण तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार मंडळातील व्यक्तींवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हे धोरणच दप्तरी दाखल करण्याचा निर्णय आज (ता. ६) स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला.