
पुणे: महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतीच वाघोली येथे पाहणी केली. त्यानंतर आज (ता. १८) शेवाळवाडी आणि मांजरी परिसरात पाहणी केली यात अस्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे, नाल्यांमधील सांडपाण्याचा प्रवाह, अतिक्रमण दिसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. यामुळे आता आयुक्तांनी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील यांच्यासह दोन उप अभियंत्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. तर एका कनिष्ठ अभियंत्यासह तिघांचे निलंबन केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.