

pune traffic
esakal
Pune Latest News: "शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम, सुरक्षित व वेगवान करण्यासाठी महापालिकेकडून अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यास थोडा वेळ लागेल, मात्र कमी खर्च व वेळेचे नियोजन करून अल्पकालीन योजना प्रत्यक्षात उतरविण्यावर प्रशासनाचा भर असेल. पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व विभागांना बरोबर घेऊन लोकसहभागातून डिसेंबर २०२६ या एक वर्षाच्या कालावधीत शहरातील रस्ते व वाहतूक व्यवस्थेत मोठा व चांगला बदल घडलेला दिसेल' असा विश्वास महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी व्यक्त केला.