Pune News : भूसंपादनाच्या प्रकरणात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार

कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रश्न मागील काही दिवसांपासून रखडलेला
pune municipal commissioner vikram kumar complaint to guardian minister ajit pawar in case of land acquisition
pune municipal commissioner vikram kumar complaint to guardian minister ajit pawar in case of land acquisitionesakal

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रश्न मागील काही दिवसांपासून रखडलेला आहे. अशातच आता भूसंपादनाच्या प्रकरणात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची तक्रार थेट पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. जागामालक माजी नगरसेवक प्रकाश कदम यांनी ही तक्रार केली असून तशा आशयाचे पत्र त्यांनी पालकमंत्र्यांना दिले आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम सुरु असून सदर रस्ता रुंदीकरण व्हावा ही आमची देखील आग्रही भूमिका होती व आहे. मात्र, गेल्या ५ वर्षापासून सदर रस्त्याचे काम भूसंपादनाच्या तिढ्यामुळे प्रलंबित पडले आहे. भूसंपादनाबाबत आयुक्तांशी झालेल्या बैठकीत निम्म्या जागेचा रोख मोबदला आणि निम्या जागेचा टीडीआर देण्यासंबधित चर्चा झाली होती.

त्याप्रमाणे आयुक्तांच्या निदर्शसनास आम्ही पूर्वी २०१५मध्ये कात्रज तलावाजवळील जागा हस्तांतरित केली असून त्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नसल्याचे लक्षात आणून दिले. त्यावर आयुक्तांकडून टीडीआर घेऊन पुढील प्रक्रिया चालू करण्याचे सांगण्यात आले होते.

pune municipal commissioner vikram kumar complaint to guardian minister ajit pawar in case of land acquisition
Pune Municipal : समाविष्ट २३ गावांतील सांडपाणी व्यवस्थापनासाठी ५३० कोटींचे कर्ज

त्यानुसार, आयुक्तांनी पुन्हा बोलणी करण्यासाठी बोलावले असता जागा ताब्यात द्या अन्यथा भूसंपादन कायद्यान्वये जबरदस्तीने जागा ताब्यात घेऊ अन्यथा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रकल्प करण्यासा याठिकाणी परवानगी देण्यात येणार नाही, असे सांगण्यात आले.

केवळ टीडीआरच्या मोबदल्यात आम्हाला जागा देणे शक्य नाही. कारण, दुसरीकडे कोठेही पूर्ण टीडीआर वापरणे अशक्य आहे, असे असतानाही आयुक्तांकडून दमबाजी करण्यात येत आहे. आयुक्तांकडून दिलेला शब्द फिरवण्यात येत असून पालकमंत्री म्हणून यामध्ये लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com