Pune Cleanliness : पुण्यातील खासगी आणि शासकीय मोकळ्या जागांवर कचरा टाकल्यास जागामालकांना पाच लाखांचा दंड, आयुक्तांची १५ दिवसांची मुदत

Pune PMC Imposes Rs 5 Lakh Fine for Unclean Open Plots, Owners Get 15 Days to Secure Land : पुणे शहरातील खासगी आणि शासकीय मोकळ्या जागांवरील कचरा व राडारोड्याची समस्या रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी कठोर निर्णय घेतला. भूखंड स्वच्छ करून पत्रे लावण्यास १५ दिवसांची मुदत दिली असून नियमभंग करणाऱ्यांना पाच लाखांचा दंड आकारला जाणार आहे
Pune PMC Imposes Rs 5 Lakh Fine for Unclean Open Plots, Owners Get 15 Days to Secure Land

Pune PMC Imposes Rs 5 Lakh Fine for Unclean Open Plots, Owners Get 15 Days to Secure Land

esakal

Updated on: 

पुणे : शहरातील खासगी व शासकीय मोकळ्या जागांवर कचरा आणि राडारोडा टाकला जात असल्याने शहर अस्वच्छ होत आहे. जागा मालकांकडून भूखंड स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता मोकळ्या जागेत अस्वच्छता निर्माण झाल्यास जागामालकांना पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसांत मोकळ्या जागांना पत्रे लावून बंदिस्त करून घ्या, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...