.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Latest Pune News: पुणे महापालिकेतर्फे शिक्षण दिनानिमित्त जाहीर करण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा आज (ता.४ ) करण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळेसह खासगी प्राथमिक शाळेतील १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम उद्या (ता.५) सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित राहणार आहेत.