
पुणे : महापालिकेच्या विविध विभागांमधील प्रस्ताव, महत्त्वाची कागदपत्रे एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पाठविताना गहाळ होतात. अनेकदा महत्त्वाच्या विषयांचे प्रस्ताव सापडत नाहीत किंवा प्रस्ताव नेमके कुठे आहेत, याचीही माहिती मिळेनाशी होते. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाऊल उचलले आहे. केंद्र व राज्य सरकारप्रमाणे महापालिका प्रशासनानेही ‘ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर करून प्रशासकीय कामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.