Pune Development : प्रशासकीय असमन्वयाचा कहर; सीमाभिंतीसाठीच्या निधीची माहिती पुणे महापालिकेला विलंबाने
Pune Municipal Corporation : आंबिल ओढ्यासह शहरातील ८८ ठिकाणी सीमाभिंतीसाठी राज्य सरकारने ₹२९.८० कोटी मंजूर केले असून, महापालिकेला याची उशिराने माहिती दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुणे : आंबिल ओढ्यासह शहरातील ओढ्या-नाल्यांभोवती ८८ ठिकाणी सीमाभिंत बांधण्यासाठी राज्य सरकारकडून २९ कोटी ८० लाख रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने निधी आल्याबद्दल महापालिकेस विलंबाने माहिती दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.