

Pune Municipal Corporation Launches Major Anti-Encroachment Drive Across Wagholi, Baner, Balewadi and Dhankawadi .
पुणे : शहरातील प्रमुख रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने रविवारी (ता. २२) शहरात धडक मोहीम राबवली. या कारवाईत वाघोली-केसनंद रस्ता, गंगाधाम चौक ते लुल्लानगर, बाणेर-बालेवाडी, औंध आणि धनकवडी-कात्रज या परिसरातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. याशिवाय रस्ते व पदपथांवर अडथळा ठरणारे ८० हून अधिक शेड, काउंटर आणि स्टॉल हटवून साहित्य जप्त केले आहे.