

पुणे : शहरातील प्रमुख रस्त्याचे झाडणकाम यांत्रिकीकरणाद्वारे (रोड स्वीपर) करण्यासाठी चार परिमंडळांसाठी निविदा काढल्या होत्या. ५.७५ टक्के जादा दराने आलेल्या चारपैकी तीन परिमंडळाच्या निविदा स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केल्या आहेत. याकामासाठी महापालिका तब्बल १२९ कोटी ६२ लाख २८ हजार ६७८ रुपये मोजणार आहे. एका परिमंडळाची निविदा मंजूर झालेली नाही. शहरातील प्रमुख १२ रस्ते रोड स्वीपरने करताना कामाची गुणवत्ता राखण्याचे आव्हान घनकचरा व्यवस्थापन विभागासमोर आहे.