Pune News : दोन हजार आशा सेविका मानधनाविना, पाच महिन्यापासून निधी नाही; महिलांपुढे आर्थिक संकट

Asha Sevika Mandhan : पुणे महापालिकेत रात्रंदिवस राबणाऱ्या दोन हजार आशा सेविकांचे पाच महिन्यांचे मानधन रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे; शासनाकडून निधी न आल्याने पालिका हवालदिल असून महिला कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात आता तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
Asha Sevika Mandhan

Asha Sevika Mandhan

esakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन हजार आशा सेविकांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नसल्याने त्यांना संसार कसा चालवावा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेकडून रोज १२ तास काम करून घेतले जात आहे, शासनाच्या आरोग्याचे उपक्रम राबविले आहेत. पण मानधन मिळत नसल्याने आशा सेविका हवालदिल झाल्या आहेत. शासनाकडून निधी न आल्याने आम्ही मानधन देऊ शकणार नाही असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com