
पुणे - घोरपडी येथील "नॅशनल वॉर मेमोरिअल'ची दुरुस्ती आणि परमवीर चक्र मिळविलेल्या जवानांचे अर्धपुतळे बसविण्यासाठीचा तीस लाख रुपयांपर्यंतचा खर्च महापालिकेने करण्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे.
पुणे कॅंटोन्मेंटच्या हद्दीत असलेल्या मोरवाडा जंक्शनजवळ लष्कराच्या वतीने "नॅशनल वॉर मेमोरिअल' उभारण्यात आले आहे. या ठिकाणी लष्करातील शहीद सैनिक व अधिकारी यांचे स्मृतिस्तंभ आहेत. याच परिसरात संरक्षक विषयक म्युझियम, वॉर मेमोरिअल, रणगाडे, युद्धामध्ये वापरलेली आयुधे ठेवण्यात आली आहेत. 2006 मध्ये नॅशनल वॉर मेमोरिअलचा पर्यटनस्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. पीएमपीएमएलच्या पुणे दर्शनअंतर्गत या वॉर मेमोरिअलला पर्यटक भेट देत असतात.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या सदर्न कमांडच्या वतीने या नॅशनल वॉर मेमोरिअलच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी फायबर मटेरिअल वापरून परमवीर चक्र मिळविलेल्या लष्करी अधिकाऱ्यांचे अर्धपुतळे, आरसीसी पिलर व वॉल तसेच लायटिंग, साउंड सिस्टिम व अन्य सुशोभीकरणाच्या कामांचे नियोजन आहे. या सर्व कामांसाठी तीस लाख रुपये खर्च अपेक्षित असून, महापालिकेने यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सदर्न कमांडच्या वतीने महापालिका आयुक्तांना करण्यात आले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.