

Pune Municipal Politics Co Opted Corporators To Test Party Leadership
Esakal
पुणे, ता. १७ : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्याचे आश्वासन अनेकांना दिले आहे. मात्र, शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार भाजपला सात, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन; तर काँग्रेसला एक स्वीकृत नगरसेवकपद मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वर्णी लावतानाही पक्षाच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे. निवडणुकीत उमेदवारीवरून प्रचंड नाराजी आणि रोषाचा सामना राजकीय पक्षांना करावा लागला होता. त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवक पदावरूनही नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे.