Pune Municipal Corporation water tanker tracking
sakal
पुणे - पाण्याची टंचाई असणाऱ्या भागांना महापालिकेतर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जातो. पण त्याचा हिशोब ठेवताना अनेक गडबडी होतात. ही प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पार पाडावी यासाठी पाषाण टँकर केंद्रासाठी ऑनलाइन प्रणाली विकसीत केली आहे. सोसायटीच्या टँकर नोंदणीपासून ते टँकरने पाणी टाकेपर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाईन होत आहे. ठरलेल्या वेळेत टँकर येत असल्याने नागरिकांचे हाल होत नाही. गेल्या वर्षभरापासून ही या प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरु असून, आता संपूर्ण शहरात याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.