

पुणे : शहरातील ओव्हरहेड केबल अधिकृत करण्यासाठी तयार केलेले धोरण महापालिकेच्या मुख्यसभेत मागे घेण्यात आले. हे धोरण मंजूर केले असते तर पुणे महापालिकेचे सुमारे दोन हजार कोटीचे नुकसान होणार होते. पण आयुक्त नवल किशोर राम यांनी हे विषयपत्र मागे घेतल्याने महापालिकेचे मोठे नुकसान टाळले आहे, अशी माहिती खात्रीलायक प्रशासकीय सूत्रांनी दिली.