Pune City : पुणे शहर विद्रूपीकरण करण्यात भाजपचेच नेते अव्वल! दोन नेत्यांनी पटकावला नंबर, पाहा संपूर्ण यादी!

Pune City Defacement Awards 2026 Announced : पुणे महापालिकेने शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६ जाहीर केले असून श्रीनाथ भिमाले यांना ‘साहेब’, पृथ्वीराज सुतार यांना ‘दादा’ आणि सुनील पांडे यांना ‘भाऊ’ हा किताब दिला आहे.
Pune Municipal Corporation announces City Defacement Awards 2026, featuring Shrinath Bhimale as Saheb, Prithviraj Sutar as Dada and Sunil Pandey as Bhau in the honorary category

Pune Municipal Corporation announces City Defacement Awards 2026, featuring Shrinath Bhimale as Saheb, Prithviraj Sutar as Dada and Sunil Pandey as Bhau in the honorary category

esakal

Updated on: 

पुणे महापालिकेच्या ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेची सध्या शहरात चर्चा सुरू आहे. अनधिकृत फ्लेक्सविरोधात नागरिकांना ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आता महापालिकेने ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६’ जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे, या उपरोधिक पुरस्कारांच्या माननीय श्रेणीमध्ये पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना ‘साहेब’, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांना ‘दादा’, तर सुनील पांडे यांना ‘भाऊ’ हा किताब देण्यात आला आहे. शहरात कोणाचे किती फ्लेक्स लागले आहेत, यावर आधारित ही वर्गवारी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...