
Pune Municipal Employees Discipline
sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा बेशिस्तपणा वाढत चालला आहे. त्यांची हजेरी व्यवस्थित लागलीच पाहिजे यासाठी विद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्यांना आयुक्तांनी १५ दिवसांत सुधारणा करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी तंबी दिली आहे. अतिरिक्त आयुक्तांनीही सर्व विभाग प्रमुखांना नोटीस बजावली आहे.