Pune Muncipal Corporation : आयुक्तांचा इशारा धाब्यावर? राडारोडा टाकणाऱ्यांना पालिका अधिकाऱ्यांकडून ‘अभय’

Pune Muncipal Corporation News : पुणे महापालिका आयुक्तांच्या कडक इशाऱ्यानंतरही नदीपात्रात राडारोडा टाकण्याचे सत्र सुरूच असून, अधिकारी दोषींवर कठोर कारवाई करण्याऐवजी किरकोळ दंड आकारून अभय देत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे, ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रशासकीय दुर्लक्ष उघड होत आहे.
Pune Muncipal Corporation News

Pune Muncipal Corporation News

esakal

Updated on

पुणे : डेक्कन परिसरात नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर कडक कारवाई झाली. त्यास अद्याप १५ दिवसही उलटले नाहीत, तोपर्यंत नदीपात्रात राडारोडा टाकण्याचा प्रकार पुन्हा सुरू झाला. विशेषतः महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून राडारोडा टाकणाऱ्यांवर किरकोळ दंडात्मक कारवाई करून सोडून दिले जात आहे. त्यांच्याकडून जबर दंड आकारणी, गुन्हे दाखल करण्याचेही कष्ट घेतले जात नाहीत. आयुक्तांच्या कडक इशाऱ्यानंतरही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून राडारोडा टाकणाऱ्यांना ‘अभय’ दिले जात असल्याची सद्यःस्थिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com