खडकवासला : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमधील नागरिकांच्या हक्कांना डावलले जात असल्याचा आरोप करत, या गावांतील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचे आवाहन ‘समाविष्ट गावे संघर्ष समिती’ने केले आहे..पुणे महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून, सध्या प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. यामध्ये पूर्वीप्रमाणेच नव्याने समाविष्ट गावांना दुय्यम वागणूक मिळण्याची भीती स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मागील निवडणुकीत ११ गावांचा एकत्रित प्रभाग ४२ करण्यात आला होता. आता देखील अशीच एकगठ्ठा रचना करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व धोक्यात येणार आहे. असे समितीचे निमंत्रक नांदेडचे राहूल घुले पाटील यांनी सकाळ’शी बोलताना सांगितले..“पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील नगरसेवकांची संख्या कायम राहावी. नव्याने समाविष्ट गावांना एकत्रित करून किंवा जुन्या प्रभागांमध्ये विलीन करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. असा आरोप केला आहे. त्या ऐवजी १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांची 2002 मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी, वडगाव धायरी परिसराची सुमारे सात हजार मतदार संख्या तीन उमेदवारांचा प्रभाग होता. त्याप्रमाणेच यंदा देखील समाविष्ट गावांची स्वतंत्र प्रभाग रचना झाली पाहिजे. कमी मतदार संख्या असली तरी, स्वतंत्र प्रभाग झाला पाहिजे. त्या गावातून चार ऐवजी दोन- तीन सदस्य संख्या झाली तरी चालेल.” अशी भूमिका घुले यांनी मांडली आहे..याविरोधात आवाज उठविणे आणि विकासकामांतील सातत्याने होणारे दुर्लक्ष थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे समितीचे मत असून, याच उद्देशाने आज शुक्रवार, दिनांक २७ जून रोजी सायंकाळी सहा वाजता धायरी येथील सावित्री गार्डन मंगल कार्यालय येथे सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीस सर्व समाविष्ट गावांतील नागरिक, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.