पुणे - पुणे महापालिकेतर्फे दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठीची तयारी पूर्ण केली आहे. ३८ हौदांसह एकूण २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्यांची व्यवस्था केली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडले जात असल्याने नदीकाठचे हौद पाण्यात बुडत आहेत, त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून लोखंडी टाक्याही नदीच्या घाटाच्या परिसरात ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.