
पुणे : पुणे महापालिका नियमीत मिळकतकर भरणाऱ्यांना कोणतीही सूट मिळत नाही. पण करबुडव्यांना थकबाकी भरण्यासाठी पुन्हा एकदा सवलत देण्यासाठी ‘अभय योजना’ आणण्याची हालचाल प्रशासनामध्ये सुरु झाली आहे. दरम्यान महापालिकेने यापूर्वी राबविलेल्या अभय योजनेचा फायदा घेणाऱ्या तब्बल १ लाख ८ हजार २०३ जणांनी पुन्हा कर थकविला असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.