

The civic body has urged citizens to avoid purchasing plots or homes in unauthorized developments without verifying legal documents.
Sakal
पुणे : पुणे महानगरपालिकेने बेकायदा बांधकामांवरील कारवाईची मोहीम पुन्हा तीव्र केली असून, मंगळवारी (ता. २८) लोहगाव आणि खराडी परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने केलेल्या या कारवाईत सुमारे २१ हजार ४०० चौरस फूट आरसीसी बांधकाम जमीनदोस्त केले.