Pune Municipal Corporation : समाविष्ट गावांमधील मिळकतकराचा प्रश्न सोडवा; आमदार भीमराव तापकीर यांची मागणी
Merged Villages : पुणे महापालिकेत समाविष्ट ३२ गावांबाबत नवा करआराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून सक्तीची वसुली सध्या करण्यात येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
खडकवासला : समाविष्ट गावांतील मिळकतकर आकारणीबाबत महापालिकेला नवीन कररचना तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तेथील रहिवाशांकडून सक्तीची वसुली करण्यात येत नाही, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधी मंडळात मंगळवारी स्पष्ट केले.