पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची नावे जाहीर

पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रारुप प्रभाग रचनेच्या 58 प्रभागांची नावे जाहीर झाली आहेत.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना उद्या जाहीर होणार असली तरी त्याची उत्सुकता ताणली गेली आहे. कोणता प्रभाव कसा होणार याची चर्चा सुरू असताना आज पुणे महापालिकेच्या (Pune Corporation Updates) संकेतस्थळावर प्रारुप प्रभाग रचनेच्या 58 प्रभागांची नावे जाहीर झाली आहेत. शहरातला पहिला प्रभाग हा धानोरी-विश्रांतवाडी असून सर्वात शेवटचा ५८ क्रमांकाचा प्रभाग कात्रज-गोकुळनगर हा आहे. विशेष म्हणजे नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या नावानेही सुमारे १० प्रभाग तयार झालेले आहेत. तसेच यामध्ये प्रस्थापित नगरसेवकांचे, पक्षनेते व पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. (Pune Corporation Election Updates)

निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेला 1 फेब्रुवारी रोजी प्रारूप आराखडा जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत त्यावर 14 फेब्रुवारी पर्यंत हरकती-सूचना घेतला असून 2 मार्च पर्यंत अंतिम प्रभाग रचनेचा अहवाल सादर करावा लागणार आहे. पुणे महापालिकेची प्रभाग रचना ही वादाची तसेच डावपेचांची झालेली आहे. पुणे महापालिकेसह निवडणूक आयोगाकडे ही अनेक बदल करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची चर्चा आहे. राज्यात सर्वात अवघड प्रश्न ही पुण्याची ठरल्याचे ही अधिकारी खासगी मध्ये मान्य करत आहेत.

त्यामुळे ही प्रभाग रचना कशी असणार याची उत्सुकता लागलेली आहे. पुणे महापालिकेतर्फे एक फेब्रुवारीला रात्री बारा वाजता महापालिकेच्या संकेतस्थळावर लिंक ओपन करून दिली जाणार आहे. तेथे प्रभाग रचना नाव व चतु:र्सीमा नकाशा नागरिकांना पाहता येणार आहे. त्यापूर्वी महापालिकेच्या संकेतस्थळावर आज केवळ प्रभागांची नावे जाहीर झाल्याने प्रभाग कसा असू शकतो याचा अंदाज लावणे शक्य झाले आहे.

ही आहेत प्रभागांची नावे

1. धानोरी – विश्रांतवाडी

2. टिंगरेनगर – संजय पार्क

3. लोहगाव - विमान नगर

4. वाघोली – इऑन आयटी पार्क

5. खराडी – चंदननगर

6. वडगावशेरी

7. कल्याणीनगर – नागपूर चाळ

8. कळस – फुलेनगर

9. येरवडा

10. शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी

11. बोपोडी – पुणे विद्यापीठ

12. औंध – बालेवाडी

13. बाणेर – सुस म्हाळुंगे

14. पाषाण – बावधन बुद्रुक

15. पंचवटी – गोखलेनगर

16. फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे

17. शनिवार पेठ – राजेंद्रनगर

18. शनिवार वाडा – कसबा पेठ

19. रास्तापेठ – के.ई.एम. हॉस्पिटल

20. पुणे स्टेशन – ताडीवाला रोड

21. मुंढवा – घोरपडी

22. मांजरी – शेवाळवाडी

23. साडेसतरानळी – आकाशवाणी

24. मगरपट्टा – साधना विद्यालय

25. हडपसर गावठाण – सातववाडी

26. भीमनगर – रामटेकडी

27. कासेवाडी – हरकानगर

28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट

29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई

30. जयभवानी नगर – केळेवाडी

31. कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगर

32. भुसारी कॉलनी – सुतारदरा

33. बावधन खुर्द – महात्मा सोसायटी

34. वारजे – कोंढवे धावडे

35. रामनगर – उत्तमनगर शिवणे

36. कर्वेनगर

37. जनता वसाहत – दत्तवाडी

38. शिवदर्शन - पद्मावती

39. मार्केटयार्ड – महर्षी नगर

40. गंगाधाम – सॅलीसबरी पार्क

41. कोंढवा खुर्द - मिठानगर

42. सय्यदनगर – लुल्लानगर

43. वानवडी – कौसरबाग

44. काळेपडळ – ससाणेनगर

45. फुरसुंगी

46. मोहम्मदवाडी – उरुळी देवाची

47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी

48. अप्पर सुपर इंदिरानगर

49. बालाजीनगर – के के मार्केट

50. सहकारनगर – तळजाई

51. वडगाव – पाचगाव पर्वती

52. नांदेडसिटी – सनसिटी

53. खडकवासला -नऱ्हे

54. धायरी – आंबेगाव

55. धनकवडी – आंबेगाव पठार

56. चैतन्यनगर – भारती विद्यापीठ

57. सुखसागर नगर – राजीव गांधी नगर

58. कात्रज – गोकुळनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Treasury Officer Suffers Heart Attack In Manchar Doctors Timely Treatment Helps Save His Life After Severe Chest Pain
Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Marathi News Esakal
www.esakal.com