PMC Election Campaign to Conclude on January 13
sakal
पुणे
Pune Municipal Election : पुण्यात प्रचाराचा धुरळा थांबणार; उद्या सायंकाळी ५ वाजता 'तोफा' थंडावणार!
Election Campaign Ends : पुणे महापालिका निवडणुकीसाठी १० दिवसांच्या धडाकेबाज प्रचारानंतर उद्या १३ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता प्रचाराची सांगता होणार आहे.
पुणे : गेल्या दहा दिवसांपासून पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमक प्रचार करून निवडणुकीची रंगत वाढवली असून, विकासाच्या मुद्द्यांसह वैयक्तीक टीका टिपणी करण्यात असल्याने प्रभागांमधील वातावरण तापले आहे. असे असताना उद्या (ता. १३) सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
