

Last Two Days Left for Pune Municipal Election Nominations
sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना विविध विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारी (ता. २९) जे इच्छुक अर्ज करतील त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल. पण मंगळवारी (ता. ३०) अर्ज केलेल्यांना प्रमाणपत्र मिळेलच याची खात्री नाही असे महापालिकेतर्फे स्पष्ट केले आहे. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी आज सर्वच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारांची गर्दी होणार आहे.