सेना-भाजपाचे वर्चस्व तरीही ससाणेनगर प्रभागातून राष्ट्रवादीला आशा

NCP - BJP - SENA
NCP - BJP - SENAsakal

हडपसर : पंधरा वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट झालेला काळेबोराटे नगर हा भाग असुविधांची भळभळती जखम माथ्यावर घेऊन 'काळेपडळ-ससाणेनगर' प्रभाग क्रमांक ४४ च्या रूपाने समोर आला आहे. हडपसर-सातववाडी व महंमदवाडी-कौसर बाग प्रभागातून दोन्हीकडे विभागलेल्या काळेपडळ तसेच ससाणेनगर व हांडेवाडी रस्त्याचा भाग तोडून या नवीन प्रभागाची रचना झाली आहे. हे दोन्हीही भाग जोडले गेल्याने मोठ्या संख्येतील नागरिकांसह निवडणूकीसाठी इच्छुकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

NCP - BJP - SENA
‘गांव तेथे एसटी’ची ओळख पुसली

दोन प्रभागांच्या विभाजनातून निर्माण झालेल्या या प्रभागात सेना-भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, दोन्ही काळेपडळ एकत्र झाल्याने हक्काचा मतदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशाही येथे पल्लवीत झालेल्या आहेत. तरीही राष्ट्रवादीला या प्रभागात मोठी कसरत करावी लागणार आहे. नात्यागोत्याचे गणित सांगून बाहेरच्या व पूर्वी येथे नशीब आजमावलेल्या उमेदवारांकडून या प्रभागावर दावा केला जात आहे. पूर्वीच्या दोन्ही प्रभागातील विद्यमानसह पराभूत व नवख्या उमेदवारांनीही येथे चाचपणी सुरू केली आहे. मात्र, स्थानिक मतदारांकडून विकासाच्या दृष्टीने स्थानिक उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचा सूर आळवला जात आहे. काळेपडळ व ससाणेनगरचा काही भाग हा हडपसर-सातववाडी प्रभागातून तर रेल्वे पलिकडील भाग महंमदवाडी- कौसरबाग प्रभागातून वगळून नवीन काळेपडळ ससाणेनगर प्रभागाची रचना झाली आहे. रेल्वे पलिकडील भागासह काळेपडळ-ससाणेनगर भागातही शिवसेनेचा प्रभाव आहे. तर भारतीय जनता पार्टीचे तीन विद्यमान नगरसेवकांमुळे चांगला जम बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा प्रस्थापित मतदारही येथे आहे. बाहेर गावाहून स्थायिक झालेला मतदारही येथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यावर प्रभाव असलेल्या उमेदवारांना येथे मोठी आशा निर्माण झालेली आहे. तोडफोड करून निर्माण झालेल्या नव्या प्रभागात संधी मिळण्याची आशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांकडून व्यक्त केली जात आहे.

NCP - BJP - SENA
महाराष्ट्रातील भाजप आमदारांची यंग ब्रिगेड गोव्यात

पूर्वीच्या प्रभागातील दोन्ही बाजूचा विद्यमानांमध्ये इकडे, तिकडे की जुन्या-नव्या अशा दोन्हीकडेही अशी संभ्रमावस्था दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपामध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने त्यांच्यामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने या प्रभागात प्रबळ दावा व्यक्त केला आहे. भाजपाकडून विद्यमानांसह नवीन चेहऱ्यांनीही उमेदवारीची प्रबळ इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचीही संख्या मोठी आहे. तीन माजी नगरसेवकांनीही येथून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. तीनही पक्षांच्या विद्यमान नगरसेवकांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा असण्याबरोबरच आपल्याबरोबरचा उमेदवार कोण असावा यासाठी कुरघोडी होणार आहे.

या प्रभागात रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेजचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. उद्याने, क्रीडांगणे, दवाखाने, अग्निशमन केंद्र ही कामे अर्धवट आहेत. रस्ते वाहतूक व्यवस्था सुरक्षित व पुरेशी नाही. विजेची ओवरहेड वाहिनी निघालेली नाही. भाजीमंडई नाही. अतिक्रमणे कायम आहेत.

NCP - BJP - SENA
धक्कादायक! खड्ड्यात पडून चार मुलांचा मृत्यू, अवैध वाळूचे बळी सुरुच

पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईनची सुव्यवस्था, बंद रेल्वे गेट खालील अंडरपास, रखडलेला रस्ते विकास, अंडरग्राउंड वीज पुरवठा हे मुद्दे नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

  • • अंदाजे मतदार संख्या : ६४ हजार

  • • जनगणनेनुसार लोकसंख्या : ५५२८७

  • • अंदाजे लोकसंख्या : ७५ हजारांपेक्षा अधिक

  • • नवी हद्द कशी असेल : संपूर्ण काळेपडळ, ससाणेनगरचा काही भाग, हांडेवाडी रोडची डावी बाजू. ढेरे काँक्रीट पर्यंत.

  • • प्रमुख समस्या : पाणी, ड्रेनेज, डीपी रस्ते, भूयारी मार्ग, अंडरग्राऊंड वीज, भाजीमंडई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com