
पुणे - विधानसभा निवडणुकीनंतर आता पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे वेध लागलेले असताना पदाधिकारी तयारीला लागले आहेत. त्याचे प्रत्यंतर स्थायी समितीच्या बैठकीतही दिसून येत आहे. महायुतीच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात वर्गीकरणाद्वारे निधी वळविण्यात आहे. स्थायी समितीने आज सुमारे १२.६० कोटी रुपयांचे वर्गीकरण केले.