Pune Municipal Corporation: महापालिकेचा हरित उपक्रम यशस्वी; तब्बल ११,६२० रोपांची लागवड करून ‘हरित पुणे’ मोहिमेला गती
Pune News: पुणे महापालिकेने राज्य सरकारकडून दिलेले १०,१०० रोपांची लागवडीचे उद्दिष्ट ओलांडले असून तब्बल ११,६२० रोपे शहरभर लावली. या उपक्रमात कडुनिंब, कदंब, आंबा, पिंपळ अशा विविध झाडांचा समावेश आहे.
पुणे : राज्य सरकारने दिलेल्या साडेदहा हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने पूर्ण करत तब्बल साडेअकरा हजारांहून अधिक रोपांची लागवड केली. शहराच्या वेगवेगळ्या भागांत १३ ठिकाणी ही लागवड केली आहे.