
पुणे : आरक्षित जागांच्या मोबदल्यात जागामालकांना हस्तांतर विकास हक्क (टीडीआर) देताना १० टक्के टीडीएस कापून घेण्याचा महापालिकेला विसर पडल्याचे समोर आले आहे. त्यापोटी सुमारे ३७५ कोटी रुपयांच्या थकबाकीची नोटीस प्राप्तिकर विभागाने बजाविल्यामुळे महापालिकेचे धाबे दणाणले आहेत.