

pune municipal corporation fire brigade 39 firefighters selected for national fire service college nagpur officer training disaster management
ESakal
पुणे : पुणे महापालिका अग्निशमन दलातील तब्बल ३९ जवानांची गेल्या दीड वर्षांत केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील नागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. यापैकी १९ जवानांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून, जुलै ते डिसेंबर २०२६ या सत्रासाठी आणखी २० जवान प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत.