Flats : पुणे महापालिकेच्या १ हजार सदनिका पडून

आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि आर ७ तरतुदीच्या अंतर्गत पुणे महापालिकेकडे असलेले १ हजार ८७ फ्लॅट विनावापर पडून आहेत.
Flats
FlatsSakal
Summary

आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि आर ७ तरतुदीच्या अंतर्गत पुणे महापालिकेकडे असलेले १ हजार ८७ फ्लॅट विनावापर पडून आहेत.

पुणे - आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि आर ७ तरतुदीच्या अंतर्गत पुणे महापालिकेकडे असलेले १ हजार ८७ फ्लॅट विनावापर पडून आहेत. त्याचा आढावा घेण्यात आला असून, हे फ्लॅट दुरुस्ती करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. आयुक्तांच्या मान्यतेनंतर या ठिकाणी कामे सुरू केली जाणार आहेत.

महापालिकेच्या विकास आराखड्यात ‘ईडब्ल्यूएस’ घरांसाठी आरक्षण टाकलेले असते. तसेच आर- ७ या नियमानुसार बांधकाम व्यावसायिक ठराविक फ्लॅट किंवा बांधकाम केलेले क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात देतात. ईडब्ल्यूएस आणि आर- ७  नुसार महापालिकेकडे एकूण ३ हजार ९०८ सदनिका ताब्यात आलेल्या आहेत. त्यापैकी १ हजार ९०४ सदनिकांचे वाटप झाल्या आहेत. विविध प्रकल्पांसाठी राखीव १३५, क्षेत्रीय कार्यालयांकडे वर्ग केलेल्या सदनिका ४४८ आणि महामेट्रोकडे ३३४ सदनिका देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे एकूण २ हजार ८३१ सदनिकांचा वापर होत आहे. पण १ हजार ०८७ सदनिका पडून आहेत.

शहराच्या विविध भागात ही घरे आहेत, पण त्यांच्या सुरक्षेकडे कोणाचेही लक्ष नसल्याने या सदनिकांचे नुकसान होत आहे. त्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. या सदनिकांमध्ये दुरुस्ती करून तेथे ठिकाणी रखवालदार आणि  सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक वेळ जागा पाहणी करणे बंधनकारक केले जाणार आहे.

भाग आणि विनावापर सदनिका

औंध - १५३

धनकवडी - २

एरंडवणा - ४४

कात्रज - ३१

वडगाव बुद्रुक - २५

बोपोडी - ७

हडपसर - १

वडगाव शेरी - ३०

कात्रज - ४८

खराडी - १६५

धायरी - ६

हडपसर - ५३

बिबवेवाडी - १६

हडपसर सर्वे क्रमांक १३२, १६७ अ - ५३७

एकूण १,०८७

महापालिकेचे ज्या सदनिका विनावापर आहेत. त्यांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. तेथे दुरुस्ती व सुरक्षा आवश्‍यक असल्याने याबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करून, त्यांच्या मान्यतेनंतर कामे केली जातील.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com