Pune Ganeshotsav Parking : पुण्यातील गणेशोत्सवात वाहनांसाठी पार्किंगची ठिकाणे झाली निश्चित

गणेशोत्सवात शहराच्या मध्यवस्तीत वाहनांच्या पार्किंगसाठी शाळा-महाविद्यालयांसह महापालिकेची आणि खासगी वाहनतळ निश्चित करण्यात आली आहेत.
Pune Parking
Pune Parkingsakal

पुणे - गणेशोत्सवात शहराच्या मध्यवस्तीत वाहनांच्या पार्किंगसाठी शाळा-महाविद्यालयांसह महापालिकेची आणि खासगी वाहनतळ निश्चित करण्यात आली आहेत. वाहतूक शाखा आणि महापालिकेकडून यंदा गतवर्षीच्या तुलनेत पार्किंगची ठिकाणे वाढविण्यात आली आहेत.

सुमारे २० शाळा-महाविद्यालयांचे आवार सायंकाळनंतर पार्किंगसाठी खुले होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात मध्यवस्तीत होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सवात मध्यवस्तीत नागरिकांना वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा मिळत नाही. गौरी विसर्जनानंतर देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढते. त्यामुळे नागरिकांना मध्यवस्तीत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

दरम्यान, गणेशोत्सव मंडळांच्या विविध प्रश्नांबाबत ‘सकाळ’ने नुकतीच बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवात नागरिकांना पार्किंगसाठी मोठी अडचण येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मध्यवस्तीतील शैक्षणिक संस्थांनी शाळा-महाविद्यालयांच्या आवारातील जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मंडळांनी केली होती.

याबाबत ‘सकाळ’ने शहर पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. ‘सकाळ’च्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून, शैक्षणिक संस्थांनीही आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत ही पार्किंग सुविधा उपलब्ध राहणार आहे. शाळा- महाविद्यालयांच्या आवारात सायंकाळनंतर पार्किंग उपलब्ध होणार आहे. बहुतांश शैक्षणिक संस्थांनी नि:शुल्क पार्किंगबाबत सहमती दर्शवली आहे. तर, काही वाहनतळांवर ‘पे ॲन्ड पार्क’ असेल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी उत्सवाच्या कालावधीत मध्यवस्तीत कमीत कमी वाहने आणावीत.

- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

वाहनतळ - वाहन क्षमता

(मध्यवर्ती पेठा) -

शिवाजी आखाडा वाहनतळ - १०० दुचाकी, २० मोटारी

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग - ४० दुचाकी

गोगटे प्रशाला - ६० दुचाकी

देसाई महाविद्यालय - पोलिस वाहनांसाठी पार्किंग

स.प. महाविद्यालय सुमारे - १२० दुचाकी

शिवाजी मराठा विद्यालय - २५ दुचाकी

नातूबाग - १०० दुचाकी

पीएमपी मैदान, पूरम चौकाजवळ - २५ मोटारी

हमालवाडा, पत्र्या मारुतीजवळ - ३०० दुचाकी, ५० मोटारी

नदीपात्रालगत - ३०० दुचाकी, ८० मोटारी

(भारती विद्यापीठ) -

पीएमपी टर्मिनल कात्रज - ३० दुचाकी, ४० मोटारी

राजीव गांधी प्राणी संग्रहालय - ३५० दुचाकी, ७० मोटारी

संतोषनगर, कात्रज भाजी मंडई - ३० दुचाकी, ३० मोटारी

(सिंहगड रस्ता) -

सणस शाळा, धायरी - १२० दुचाकी

राजाराम पूल ते विठ्ठलवाडी कमान चर्चची जागा - १०० मोटारी

(दत्तवाडी) -

सारसबाग, पेशवे पार्क - १०० दुचाकी

हरजीवन रुग्णालयासमोर, सावरकर चौक - ३० दुचाकी

पाटील प्लाझा पार्किंग - १०० दुचाकी

मित्रमंडळ सभागृह - ३० दुचाकी

पर्वती ते दांडेकर पूल - १०० दुचाकी

दांडेकर पूल ते गणेश मळा - ३०० दुचाकी

गणेश मळा ते राजाराम पूल - ४०० दुचाकी

नीलायम टॉकीज - १०० दुचाकी, ८० मोटारी

(डेक्कन परिसर) -

विमलाबाई गरवारे हायस्कूल - १०० दुचाकी

आपटे प्रशाला - १०० दुचाकी

आबासाहेब गरवारे महाविद्यालय - २०० दुचाकी, मोटारी

फर्ग्युसन महाविद्यालय - ५०० दुचाकी आणि मोटारी

मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय - १०० दुचाकी

संजीवन वैद्यकीय महाविद्यालय - १५० दुचाकी, मोटारी

जैन वसतिगृह, बीएमसीसी रस्ता - २०० दुचाकी, मोटारी

(शिवाजीनगर)-

सीओईपी महाविद्यालय - २५० ते ३०० दुचाकी, मोटारी

एसएसपीएमएस महाविद्यालय - २५० दुचाकी

(कोंढवा) -

भक्ती वेदांत पार्किंग - ३०० दुचाकी, मोटारी

(हंडेवाडी) -

दादा गुजर शाळा - ५०० दुचाकी

जुने इदगाह मैदान, चिंतामणीनगर - १००० दुचाकी

भानगिरे शाळा - ८०० दुचाकी

(हडपसर) -

बंटर स्कूल - १०० दुचाकी, ५० मोटारी

एस.एम. जोशी स्कूल - २०० दुचाकी, ५० मोटारी

(मुंढवा) -

पीएमपी बस थांबा, सप्तशृंगी माता मंदिराजवळ - ६० दुचाकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com