पुणे : विसर्जनासाठी १५० फिरते तर ३०३ स्थिर हौद

गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेकडून १५० फिरते हौद उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासह ३०३ ठिकाणी हौद, लोखंडी टाक्यांची देखील सोय उपलब्ध असतील.
Ganpati-Visarjan
Ganpati-Visarjansakal
Summary

गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेकडून १५० फिरते हौद उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासह ३०३ ठिकाणी हौद, लोखंडी टाक्यांची देखील सोय उपलब्ध असतील.

पुणे - गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेकडून १५० फिरते हौद उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासह ३०३ ठिकाणी हौद, लोखंडी टाक्यांची देखील सोय उपलब्ध असतील. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २१६ ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र उपलब्ध आहेत.

रविवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी विसर्जन हौदांचे नियोजन पालिकेच्यावतीने वार्डस्तरावर करण्यात आले आहे. तर विसर्जन घाटावर देखील खबरदारीत्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोणताही गैरप्रकार घडून नये, यासाठी आवश्‍यक काळजी घेतली जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कोणत्या ठिकाणी हौद असतील याची माहिती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी नऊ ते रात्री ११ दरम्यान ठरवून दिलेल्या मार्गावर हे फिरते हौद असणार आहेत. मात्र क्षेत्रीय कार्यालयांनुसार फिरत्या हौदांसाठी स्वतंत्र वेळा आहेत. त्यानुसार काही भागांत सकाळी १० ते दुपारी तीन दरम्यान हे हौद उपलब्ध असतील, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.

पहिल्या तीन दिवसांत ११ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन -

गणेशोत्सवाची सुरवात झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांत (३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर) एकूण १० हजार ९९७ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यातील सर्वाधिक सात हजार ८४४ मुर्ती या लोखंडी टाक्यात विसर्जित करण्यात आल्या. तर अनेक गणेश भक्तांनी बांधलेल्या हौदात विधिवत पद्धतीने मूर्तींचे विसर्जन करण्यास पसंती दिली.

विसर्जन झालेल्या मूर्तींची संख्या व कोठे विसर्जन

तारीख - बांधलेले हौद - लोखंडी टाक्या- संकलित केलेल्या मुर्ती- फिरते हौद- एकूण मुर्ती संख्या

३१ - ३१ -२६- २५- ०- ८२

२- ११३४- ७३२२- १३०३- ७१- ९८३०

३- ३४३ - ४९६- १६८- ८७- १०५८

एकूण - १५०८- ७८४४- १४९६- १४९- १०९९७

गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सोय भक्तांना सहजासहजी उपलब्ध व्हावी म्हणून रविवारी १५० फिरते हौद असणार आहेत. त्यासाठी ३०३ ठिकाणी हौद, लोखंडी टाक्या देखील असतील. त्याबाबतचे नियोजन वॉर्डनुसार करण्यात आले आहे.

- डॉ. केतकी घाटगे, सहायक आरोग्य अधिकारी

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com