

Seven Gas Crematoriums Planned in Pune to Reduce Burden on Vaikunth Smashanbhumi
पुणे : अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमीत लागणारा वेळ आणि होणारी गर्दी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने शहरातील विविध भागांत गॅस दाहिन्या उभारण्याचे काम सुरु केले आहे. विद्युत विभागाने सात ठिकाणे निश्चित केली असून, यातील तीन ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन ठिकाणी स्थानिकांच्या विरोधामुळे काम रखडले आहे.