PMC Recruitment 2026 : आरोग्य निरीक्षक पदांसाठी पुण्यात 30 जागा अन् 4 हजारांहून अधिक अर्ज! एका जागेसाठी 138 जणांत चुरस; मुलाखतीची तारीख कधी?

Pune Health Inspector Recruitment 2026 : पुणे महापालिकेच्या ३० आरोग्य निरीक्षक पदांसाठी तब्बल ४,१२६ अर्ज आले आहेत. एका जागेसाठी १३८ उमेदवार स्पर्धेत असून, पात्र अर्जांची छाननी करून निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.
PMC Health Inspector Vacancy 2026

PMC Health Inspector Vacancy 2026

esakal

Updated on

पुणे : पुणे शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम करण्यासाठी महापालिकेने कंत्राटी पद्धतीने ३० आरोग्य निरीक्षकांची भरती करण्यासाठी जाहिरात काढली होती. त्यासाठी तब्बल चार हजार १२६ अर्ज प्राप्त झाले असून, एका जागेसाठी १३८ उमेदवारांमध्ये स्पर्धा होणार (PMC Health Inspector Vacancy 2026) आहे. त्यामुळे आता उमेदवारी निवडीत प्रशासनाचाच कस लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com