Pune News : पुणे महापालिकेच्या दवाखान्यात घटसर्प-धनुर्वाताच्या लसीचा तुटवडा

पुणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रामंध्ये घटसर्प-धनुर्वाताच्या (टीडी) लसीचा तुटवडा आहे.
TD Vaccine
TD VaccineSakal
Summary

पुणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रामंध्ये घटसर्प-धनुर्वाताच्या (टीडी) लसीचा तुटवडा आहे.

कात्रज - पुणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रामंध्ये घटसर्प-धनुर्वाताच्या (टीडी) लसीचा तुटवडा आहे. शहरातील प्रत्येक केंद्रावर आठवडाभराने लस येईल असे केंद्र प्रमुखांकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र मागील तीन महिन्यापासून लसीचा तुटवडा असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून त्यांच्यावर दवाखान्यात फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे.

महापालिका कोणत्याही प्रकारची लस खरेदी करत नाही. महापालिकेला संपूर्ण लसीचा पुरवठा हा राज्य सरकारकडून होत असतो. त्यामुळे महापालिकेच्या मुख्य लसीकरण कार्यालयाकडून राज्याच्या कुटुंब कल्याण कार्यालयाकडे १६ जानेवारी २०२३ रोजी २० हजार लसीची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर दोन महिन्याच्या काळात राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्रत्यक्षात केवळ २४०० घटसर्प-धनुर्वाताच्या (टीडी) लसीचा पुरवठा करण्यात आलेला आहे.

नारायण पेठेतील मुख्य लसीकरण वितरण केंद्रात सद्यस्थितीत एकही लस उपलब्ध नाही. आरोग्य केंद्रावर घटसर्प-धनुर्वाताची लस मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून त्यांना खाजगी दवाखान्यात जाऊन या लसीची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना महापालिकेचा हक्काचा दवाखाना असतानाही अर्थिक भुर्दंड बसत आहे. त्याचबरोबर नाहक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे.

प्रतिक्रिया

राज्य सरकारकडून आम्हाला मागणीप्रमाणे लस मिळालेली नाही. या महिन्याच्या शेवटी मिळेल, असे सांगण्यात आले होते. परंतु, आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने कधी पुरवठा होईल असे हे सांगता येत नाही, असे कुटुंब कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

- डॉ. सुर्यकांत देवकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

TD Vaccine
Pune Crime : धावत्या रेल्वेतून पत्नी, मुलीला ढकलले; मुलीचा मृत्यू, आरोपी पतीला अटक

आम्ही धनुर्वाताची लस घेण्यासाठी महापालिकेच्या दवाखान्यात गेलो होतो. मात्र, लस उपलब्ध नव्हती. आठ दिवसानंतर येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, आम्ही पंधरा दिवसांनंतर जाऊनही दवाखान्यात लस उपलब्ध नव्हती.

- मंजू लोंढे, स्थानिक नागरिक

महापालिकेच्या आरोग्य केंद्रात दोन महिन्यापासून घटसर्प-धनुर्वाताच्या लस मिळत नसल्याची बाब गंभीर आहे. यामुळे नागरिकांवर फेऱ्या मारण्याची वेळ तर येतेच. परंतु अर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.

- मनिषा कोपनर, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com