Illegal Hording : पुणे : अनधिकृत होर्डिंग भोवणार, मिळकतीवर बोजा चढविण्यास सुरवात

गेल्या काही महिन्यांपासून पुणे महापालिकेने अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनरच्या विरोधात कडक कारवाई सुरू केली आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Summary

गेल्या काही महिन्यांपासून पुणे महापालिकेने अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनरच्या विरोधात कडक कारवाई सुरू केली आहे.

पुणे - महापालिकेची मान्यता न घेता अनधिकृतपणे इमारतींवर किंवा शेजारच्या जागेत होर्डिंग उभारणाऱ्या जागा मालकांच्या मिळकतीवर बोजा चढविण्यास आकाश चिन्ह विभागाने सुरवात केली आहे. त्यामुळे या होर्डिंगचे वार्षिक शुल्क मिळकतकरातून वसूल केले जाणार आहे. आत्तापर्तंय ३८ मिळकतींवर बोजा चढविण्यास सुरवात झाली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेने अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनरच्या विरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. शहरात सुमारे १९०० अनधिकृत होर्डिंग आहेत. यातून होर्डिंग व्यावसायिक महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत असले तरी महापालिकेच्या तिजोरीत एकही पैसा जमा होत नाही. या अनधिकृत होर्डिंगवर क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाई केली जात आहे.

महापालिकेने नोव्हेंबर महिन्यात केलेल्या विशेष कारवाईत १८ हजार ३७६ अनधिकृत जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर्स हटविले आहे. त्यामध्ये १३६ अनधिकृत होर्डिंगचा समावेश आहे. या प्रत्येक होर्डिंगसाठी जागा मालकाकडून ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येतो. पण गेल्या महिन्यात केवळ ३ लाखाचा दंड वसूल झाला आहे. उर्वरित दंड हा मिळकतीवर बोजा चढवून वसूल केला जाणार आहे.

विनापरवाना जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर, झेंडे, साइड आणि फ्रंट मार्जिनमध्ये नामफलक, साइनेजेस उभारू नयेत आणि शहर विद्रूपीकरण थांबवावे, असे आवाहन परवाना आणि आकाशचिन्ह विभागाकडून करण्यात आले आहे. विद्रूपीकरण करणाऱ्या -या संबंधितांवर दंडात्मक आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. नामफलकधारकांनी त्यांच्या फलकांचे नियमितीकरण करण्यासाठी कागदपत्रांसह आपले प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com