ITI School : ओरिसाच्या धर्तीवर होणार पुणे महापालिकेचे 'आयटीआय' विद्यालय

पुणे महापालिकेचे औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय आता कात टाकण्याची चिन्हे असून ओरिसाच्या धर्तीवर महापालिकेच्या "आयटीआय'मध्ये ही नवीन तंत्रज्ञान, अभ्यासक्रम व अत्यावश्‍यक सोई-सुविधा देण्यात येणार.
pune municipal school
pune municipal schoolsakal

पुणे - महापालिकेचे औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय आता कात टाकण्याची चिन्हे असून ओरिसाच्या धर्तीवर महापालिकेच्या 'आयटीआय'मध्ये ही नवीन तंत्रज्ञान, अभ्यासक्रम व अत्यावश्‍यक सोई-सुविधा देण्यात येणार आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्यासाठी महापालिकेच्या 'आयटीआय' विद्यालयाची वाटचाल सुरु झाली आहे.

शुक्रवार पेठेमध्ये महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) विद्यालय आहे. महापालिकेचे "आयटीआय' असूनही आत्तापर्यंत प्रशासनाचे त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष नव्हते. महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे संबंधित "आयटीआय'ची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी विद्यालयाची दुरावस्था झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी काही प्रमाणात निधी मंजुर करुन तेथे दुरुस्ती केली. त्याचबरोबर ओरिसाच्या धर्तीवर "आयटीआय' व्हावे, हि संकल्पना त्यांनी शिक्षकांपुढे मांडली. त्यासाठी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद मुळे, प्रभारी पर्यवेक्षक निलेश पवार व शाळाप्रमुख सुरेश विधाते यांना ओरीसा येथील आयटीआय पाहण्यासाठी पाठविले. तेथे नुकतीच भेट देऊन आल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या "आयटीआय'चा चेहरामोहरा बदलण्यासाठीच्या उपाययोजना सुचविल्या.

'आयटीआय'चे प्रभारी प्राचार्य प्रमोद मुळे म्हणाले, 'ओरीसामध्ये अत्याधुनिक पद्धतीचे "आयटीआय' आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्यासाठी आवश्‍यक यंत्रसामुग्री, सोई-सुविधा, प्रात्यक्षिके, शासनाचे मोबाईल ऍप, महिलांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम, बेकर्स अभ्यासक्रम असे वैविध्यपुर्ण अभ्यासक्रम तिथे उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे आयटीआयमध्ये कुशल मनुष्यबळ तयार होऊन त्यांना नोकरीची चांगली संधी मिळत आहे. त्याच धर्तीवर महापालिका 'आयटीआय'मध्येही बदल केला जाईल.'

'पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्रामध्ये 40 टक्के मनुष्यबळ ओरीसामधुन येते. त्यामुळे तेथील आयटीआय प्रकल्पाची मी पाहणी केली, त्याच पद्धतीने महापालिकेचे आयटीआय व्हावे, इथल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, नोकरी मिळावी, या हेतूने शिक्षकांना ओरीसा येथे पाठवून अभ्यास करायला सांगितले. आता पर्यंत 30 टक्के पायाभुत सुविधांचे काम आम्ही केले आहे. उर्वरीत काम लवकरच करु.'

- विकास ढाकणे, अतिरीक्त आयुक्त.

"ओरिसा आयटीआय'ची वैशिष्ट्ये

- अद्ययावत तंत्रज्ञानाचा "आयटीआय'मध्ये वापर

- स्कील म्युझियम, पीपीटी, सोलर टेक्‍नीशीयन

- मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे प्रशिक्षण

- ड्रोन, रोबोट रिपेरींगसारखे नाविण्यपुर्ण अभ्यासक्रमांचा समावेश

- टाटासह बहुराष्ट्रीय कंपन्यांसमवेत प्रशिक्षण व नोकरीबाबत करार

महापालिका आयटीआय विद्यार्थी संख्या

प्रथम वर्ष - 100

द्वितीय वर्ष - 200

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com