"PMC Junior Engineer Recruitment
sakal
पुणे : महापालिकेतील १६९ कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीतील अडथळे संपण्याचे नाव घेत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या भरतीतील उमेदवारांची परीक्षा झाली, निवड यादी जाहीर झाली, कागदपत्रांची छाननीदेखील झाली. तरीही गेल्या जवळपास तीन आठवड्यांपासून या अभियंत्यांच्या महापालिकेत नियुक्तीचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. या भरती प्रक्रियेवर काही जणांनी आक्षेप घेतल्याने प्रशासनाने सर्व प्रक्रिया ठप्प केली आहे.