Pune : बाजीरावांच्या नावाची पाटी बसविण्यासाठी पुणे महापालिकेकडे निधीची कमतरता ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

बाजीरावांच्या नावाची पाटी बसविण्यासाठी पुणे महापालिकेकडे निधीची कमतरता !

पुणे : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावर बाजीराव पेशवे यांच्या नावाची पाटी गेल्या अडीच वर्षांपासून गायब झाली आहे. ती पाटी लावावी, या पेशवे यांच्या वंशजांच्या मागणीला निधी उपलब्ध नसल्याचे अजब उत्तर महापालिकेने दिले आहे. तसेच प्रायोजक आणल्यास पाटी लावू, असेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुचविले आहे. यामुळे महापालिकेची आस्था आणि कारभार पुन्हा अधोरेखित झाला आहे ! बाजीराव रस्त्यावर सणस प्लाझाच्या समोरच्या बाजूच्या पदपथावर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाची पाटील महापालिकेने पूर्वी लावली होती. सुमारे

सुमारे अडीच वर्षांपूर्वी ही पाटी काढून टाकण्यात आली. ती पुन्हा लावावी, यासाठी पेशव्यांच्या वंशज आदिती अत्रे गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेच्या विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयात पाठपुरावा करीत आहेत. मात्र, विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने ‘आमच्याकडे पैसे नाहीत. प्रायोजक आणा. लगेच लावतो’ असे संतापजनक उत्तर दिल्याचे अत्रे यांनी ‘सकाळ’ला कळविले. पेशव्यांच्या बाबतीत अशी उत्तरे मिळावीत हे महापालिकेला लांच्छनास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले. या बाबत अत्रे म्हणाल्या, ‘‘महत्त्वाच्या रस्त्यावर पाटी पुन्हा बसवावी, यासाठी पाठपुरावा करावा लागतो आणि तो केल्यावर असे उत्तर मिळते, याचे वाईट वाटते.

मला कोणताही वाद निर्माण करायचा किंवा कोणाला दोष द्यायची नाही. परंतु, बाजीराव रस्ता, अशी पाटी पुन्हा बसविण्यात यावी, एवढीच विनंती आहे.’’ या बाबत ‘सकाळ’ने विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत. या बाबत नगरसेवक राजेश येनपुरे म्हणाले, ‘‘बाजीराव रस्त्यावर थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाची पाटी तातडीने बसविण्यात येईल. तसेच निधी नसल्या लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौक ते मित्रमंडळ चौक दरम्यानच्या रस्त्याला चिमाजी अप्पा यांचे नाव आहे. त्यांच्या नावाच्या पाटीचीही दुरवस्था झाली आहे.चे उत्तर कोणत्या अधिकाऱ्याने दिले या बाबत माहिती घेऊन त्यांच्याकडे विचारणा करू.’’

बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट रोजी शऩिवारवाड्यावर कार्यक्रम झाला. महापौर मुरलीधर मोहोळ त्या प्रसंगी उपस्थित होते. तेव्हा महापौरांना या बाबत सांगितल्यावर त्यांनी पाटी बदलू असे सांगितले. मात्र, अद्याप ही पाटी बदलण्यात आली नाही, असेही अत्रे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.