

PMC Announces Cleaning Drive for Katraj, Jambhulwadi, and Pashan Lakes
Sakal
कात्रज : पुणे महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र, कात्रज येथील कात्रज तलाव, तसेच जांभूळवाडी तलाव आणि पाषाण तलाव यांच्या स्वच्छतेचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. हे काम महापालिकेच्या मलनिःसारण विभागामार्फत आणि शासनाच्या जलसंपदा यांत्रिकी विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार असून १९ जानेवारी २०२६ नंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.