
पुणे : पूरस्थिती किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीवेळी तत्काळ मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक महापालिकेचा आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित झाला आहे. नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, तंत्रज्ञान व मनुष्यबळाद्वारे सध्या संबंधित कक्ष २४ तास कार्यरत आहे, तर या कक्षाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम अद्याप शिल्लक आहे.