

पुणे - पुणे महापालिकेचा डोलारा सांभाळताना प्रशासन, नगरसेवकांच्या नाकी नऊ येत आहे, अशी स्थिती असताना पुणे महापालिकेचे सत्ताधारी आणि प्रशासनातील अधिकारी हे वेगवेगळ्या शासकीय परदेश दौऱ्यांवर गेले आहेत. महापालिकेला तीन दिवस सुट्टी असली तरी एकही प्रमुख अधिकारी व पदाधिकारी शहरात नसल्याने महापालिकेचा कारभार रामभरोसे आहे. चुकून अप्रिय आपत्कालीन घटना घडली तर जबाबदारी कोण घेणार, अशी स्थिती निर्माण झालेली आहे.