pune municipal corporation
sakal
Pune Latest News: पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला असून, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महापालिका भवनात ही निवडणूक होणार आहे. याबाबत विभागीय आयुक्तांकडून महापालिका आयुक्तांना पत्र पाठविण्यात आलेले आहे. दरम्यान, महौपारपदासाठी इच्छुक असलेल्या महिला नगरसेवकांनी त्यांचे नाव या पदासाठी अंतिम करावे, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु केले आहेत.