पुणे : महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला कोरोनाला चकवा

टीम ई-सकाळ
मंगळवार, 7 जुलै 2020

सोमवारपासून होम क्वॉरंटाइन' झालेले आयुक्त गायकवाड, अग्रवाल हेही बुधवारपासून महापालिकेत येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापासून महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि आजी-माजी आमदारांना कोरोनाबाधित असल्याचे अहवाल येत आहेत. 

पुणे : पुण्यात दहशत माजविलेल्या कोरोनाच्या तावडीतून महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे हे मात्र सापडू शकले नाहीत. अर्थात, गायकवाड, अग्रवाल यांच्या स्वच्छ' तपासणीचा अहवाल 'निगेटिव्ह' आल्याचे महापालिका प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले. परिणामी, महापौरांसह काही नगरसेवकांना बाधा झाल्याने घाबरलेल्या प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, सोमवारपासून होम क्वॉरंटाइन' झालेले आयुक्त गायकवाड, अग्रवाल हेही बुधवारपासून महापालिकेत येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यातील राजकीय क्षेत्राभोवतीचा कोरोनाचा विळखा मंगळवारी आणखी घट्ट झाला असून, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापासून महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि आजी-माजी आमदारांना कोरोनाबाधित असल्याचे अहवाल येत आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड भीती आहे. गेल्या पंधरा दिवसांत महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह आजी-माजी आमदारांच्या बैठकांना हजेरी लावलेल्या बहुतांशी अधिकारीही घाबरले होते. त्यात महापौरांसोबत सगळ्याच बैठकांना हजेरी लावणारे आयुक्त गायकवाड, गेली साडेतीन महिन्यांहून अधिक काळ रस्त्यावर उतरून पुणेकरांना सुरक्षित ठेवणाऱ्या अग्रवाल आणि आरोग्य खात्याची जबाबदारी सांभाळणारे डॉ. हंकारे यांचीही मंगळवारी सकाळी तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर पुढच्या काही तासांत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तरीही, यापुढच्या काळात महापालिकेत खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा - कोथरूडकरांसाठी चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर बातमी

दुसरीकडे, गायकवाड आणि अग्रवाल यांनी सोमवारी दिवसभर होम आयसोलेशन असूनही काम केले. झूमच्या माध्यमातून बैठका नवे आदेश त्याची अंमलबजावणी, डॉक्टर आणि टेक्निशिएन चे प्राशिक्षण देऊन अग्रवाल यांनी आपली कामे आटोपली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune municipal corporation officers coronavirus negative