पुणे महानगरपालिकाSakal
पुणे
Pune News: पुणे महापालिकेत RTI चा गैरवापर; माहिती काढून अधिकारी, कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल
Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या कामाबाबत तक्रारी करून, माहिती अधिकार कायद्यातून माहिती काढून अडवणूक करणे, पैशांची मागणी करणे, खोट्या तक्रारी करण्याच्या प्रकरणांमुळे अधिकारी, कर्मचारी हैराण झाले आहेत.
Pune Municipal Corporation Right to Information Act
पुणे : पुणे महापालिकेच्या कामाबाबत तक्रारी करून, माहिती अधिकार कायद्यातून माहिती काढून अडवणूक करणे, पैशांची मागणी करणे, खोट्या तक्रारी करण्याच्या प्रकरणांमुळे अधिकारी, कर्मचारी हैराण झाले आहेत. अनेकदा तर बडे राजकारणी अशा तक्रारींना खतपाणी घालत असल्याने ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांवर नियंत्रण आणा, अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे.

