

Pune Municipal Corporation Recovers Over Rs 1.87 Crore in Penalties for Public Littering and Dirt
Sakal
पुणे : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे आणि उघड्यावर लघुशंका करून अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात पुणे महापालिकेने गेल्या आठ महिन्यांत १ कोटी ८७ लाख ८२ हजार ३२५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. पण तरीही कायद्याचा धाक निर्माण होत नसल्याने बेशिस्त नागरिकांना दणका देण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केला जाणार आहे.