
पुणे : महापालिकेची विविध खाते, विभाग, क्षेत्रीय कार्यालये यांच्याकडून विविध प्रकारच्या कामांसाठी शेकडो निविदा काढल्या जातात, त्यावर लाखो रुपयेही खर्च केले जातात. प्रत्यक्षात मात्र कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट निघतो. अशा निकृष्ट कामांवर आता थेट महापालिका आयुक्तांचीच नजर राहणार आहे. पाच लाख रुपयांवरील विविध विकासकामांची गुणवत्ता व दर्जाची तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.