
पुणे : महापालिकेच्या विविध प्रकारच्या कारवाईवेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले, मारहाणीच्या घटना, तसेच महापालिकेची उद्याने, मिळकतींच्या ठिकाणी घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेकडून खास शीघ्र कृती दलाची (क्यूआरटी) पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे वादाच्या घटना टाळण्यासह उद्याने, क्षेत्रीय कार्यालये व परिमंडळांच्या संरक्षणावर भर दिला जाणार आहे. महापालिकेच्या ‘क्यूआरटी’चे पहिले पथक एक सप्टेंबरपासून महापालिकेच्या सुरक्षेच्या ताफ्यात दाखल होणार आहे.